बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खानचे चाहते तर जगभरात आहेत. इंडस्ट्रीतही शाहरुखसोबत काम करण्याची बऱ्याच महिला कलाकारांची इच्छा असते. पण आता एका अभिनेत्रीने शाहरुखसाठी असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. ‘शाहरुख मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल पण माझ्यासोबत एका चित्रपटात काम कर,’ असं ती म्हणतेय. ही अभिनेत्री म्हणजे ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख. फातिमा तिच्या लहानपणापासूनच शाहरुखच्या प्रेमात आहे.

शाहरुख विवाहित असल्याचं कळताच पूर्ण दिवस मी रडत होती, असं ती म्हणाली. बालकलाकार असताना शाहरुखच्या ‘वन टू का फोर’ चित्रपटाचे शूटिंगच्या वेळी ही गोष्ट समजल्याचं तिने सांगितलं. फातिमाने आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण शाहरुखसोबत काम करण्याची तिची तीव्र इच्छा आहे. ‘माझ्या विश लिस्टमध्ये फक्त एकाच अभिनेत्याचं नाव आहे आणि ते म्हणजे शाहरुख. त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. त्यांच्या आगामी ‘झीरो’ या चित्रपटाचीही मला प्रचंड उत्सुकता आहे,’ असं ती म्हणाली.

Photos : चर्चा तर होणारच! दीप-वीरच्या लग्नाचे भन्नाट मीम्स व्हायरल 

‘दंगल’ चित्रपटातील फातिमाच्या अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं. त्यानंतर आमिरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्येही ती झळकली. फातिमाच्या या विनंतीनंतर आता बॉलिवूडचा ‘बादशहा’ तिच्यासोबत काम करण्यास तयार होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.