अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची बहिण करिश्मा कपूर यांचे संगोपन त्यांची आई बबिता कपूर यांनी एकट्याने केले. २००७ मध्ये करीनाने दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला. लहानाच्या मोठ्या होत असताना करीना आणि करिश्मा या वडील रणधीर कपूर यांना फार कमी वेळ्या भेटल्या होत्या. तसेच कपूर कुटुंबीयांनी बबिता यांना आर्थिक मदत करण्यास नकार दिल्याचा खुलासा करीनाने केला.
बबिता आणि रणधीर यांनी ‘कल आज और कल’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर ६ नोव्हेंबर १९७१ रोजी त्यांनी लग्न केले. पण १९८८मध्ये रणधीर हे मुलींना आणि पत्नीला सोडून आई-वडिलांसोबत राहू लागले. त्यानंतर करिश्मा आणि करीना या बबिता यांच्यासोबत राहत होत्या. त्यावेळी त्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत होतो. तसेच त्या वेळी कपूर कुटुंबीयांनीही बबिता यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्यांना आर्थिक मदत करण्यासही नकार दिला होता.
आणखी वाचा : स्वत:ला ‘हॉट संघी’ म्हणत कंगनाने शेअर केले बिकिनीमधील फोटो
View this post on Instagram
करीनाने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलातीमध्ये करिश्मा स्टार होण्यापूर्वीची त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती याचा खुसाला केला होता. ‘आई सतत काही तरी काम करत असे. तिने एकटीनेच आम्हाला लहानाचे मोठे केले. ती रिअल इस्टेटच काम करायची. त्यासोबतच इतरही लहान काम करायची. तो काळ आमच्यासाठी फार कठीण होता’ असे करीना म्हणाली.
पुढे करीना म्हणाली, ‘आम्हाला एकटं सोडले होते. पण आता आम्ही वडिलांना भेटतो. जेव्हा लहान होतो तेव्हा वडिलांना आम्ही फार भेटायचो नाही. आता आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र आहोत.’