मनोज वाजपेयी गेल्या काही दिवसांपासून ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. मनोज फक्त सीरिजमध्ये नाही तर खऱ्याखुऱ्या आयुषयातही फॅमिली मॅन आहे. मनोजच्या पत्नीचे नाव शबाना आहे. शबाना देखील कधीकाळी अभिनेत्री होती. पण एक अशी घटना घडली की शबाना दु:खी झाली आणि ती परत चित्रपटसृष्टीकडे वळलीच नाही.
शबानाने ‘करीब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या चित्रपटात शबानाने बॉबी देओल सोबत काम केले होते. त्यानंतर तिने अजय देवगनच्या ‘होगी प्यार की जीत’ आणि रितिक रोशनच्या ‘फिजा’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांच नाव बदललं. परंतु शबानाने तिला नेहा म्हणून ओळखल पाहिजे अशी इच्छा कधीच व्यक्ती केली नाही. ती नाव बदलण्याच्या विरोधात होती. २००८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शबानाने कशा प्रकारे तिच्यावर नाव बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता ते सांगितले.
View this post on Instagram
शबाना म्हणाली, “मी कधी नेहा नव्हती. मी नेहमीच शबाना होती. नाव बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि मी त्या गोष्टीच्या विरोधात होती. माझ्या आई-वडिलांनी गर्वाने माझं नाव शबाना ठेवलं होतं. त्याला बदलण्याची काहीही गरज नव्हती. परंतु कोणी माझं ऐकलं नाही. जेव्हा मी चित्रपटसृष्टीत एण्ट्री केली, मी खूप मोठी झाली. पूर्वी मी सर्व गोष्टींबद्दल खूप घाबरत होते पण आता मला गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजल्या आहेत.”
आणखी वाचा : ‘केआरके कुत्ता है’ गाण्यावरुन वाद, कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी
पुढे शबाना म्हणाली, “याच कारणामुळे संजय गुप्ता आमि अलिबागच्या संपूर्ण टीमसोबत काम करणे माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट अनुभव होता. मी संजयला सांगितले की मला माझ्या खर्या नावाने काम करायचे आहे आणि त्यासाठी ते तयार देखील झाले. मी माझी खरी ओळख गमावली होती आणि आता ती मला परत मिळणार होती.”
आणखी वाचा : अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम
शबानाचा सगळ्यात शेवटचा चित्रपट हा ‘अॅसिड फॅक्ट्री’ होता. हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. शबानाने तामिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीत देखील काम केले आहे.