बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांचे आज बुधवारी (७ जुलै) सकाळी साडेसात वाजता निधन झाले. ते काही काळ आजारी होते आणि त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. दिलीप कुमार यांचे लाखो चाहते भारतातच नव्हे, तर पाकिस्तानमध्येही होते. केवळ सिनेमाच नव्हे, तर दिलीप कुमार यांना क्रिकेटचेही वेड होते. जेव्हा त्यांना संधी मिळत होती, तेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर पोहोचत असे.
दिलीप कुमार अशाच एका संस्मरणीय क्रिकेट सामन्याचा भाग झाले होते. हा सामना १९६२ मध्ये झाला होता. दिलीप कुमार आणि राज कपूर हे दोन दिग्गज मैत्रीपूर्ण सामन्यात आमनेसामने आले होते. सिनेमा कामगारांसाठी निधी गोळा करणे हा या सामन्याचा उद्देश होता.
१९६२मध्ये झाला होता सामना
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यात चांगली मैत्री होती. या दोघांचे बालपण पेशावरमध्ये गेले. मुंबईत येऊन दिलीप कुमार सुपरस्टार बनल्यानंतरही त्यांच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. १९६२मध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यातही त्यांची मैत्री पाहायला मिळाली. हा सामना राज कपूर यांच्या टीमने जिंकला, परंतु दिलीप कुमार आपल्या मित्राच्या विजयामुळे खूश होते. त्याच्या चेहऱ्यावर पराभवाचा कोणताही खेद नव्हता. या सामन्यात दिलीप कुमार यांनी राज कपूर यांच्या गोलंदाजीवर शानदार चौकार ठोकले होते.
हेही वाचा – India Vs England: पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कलला पाठवण्याची टीमची मागणी निवड समितीनं धुडकावली
राज मेहरा यांनी केले होते समालोचन
या सामन्यादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन आयएस जोहर आणि जॉनी वॉकर यांनीही आपल्या स्टाईलने सर्वांना हसवले. सामन्याचे समालोचन राज मेहरा केले होते. हा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. मायानगरीच्या स्टार्सचा हा सामना मजेदार झाला होता. यात मेहमूद, प्राण, शम्मी आणि शशी कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. याशिवाय मनोज कुमार, राजेंद्र कुमार, नंदा या कलाकारांनाही जबरदस्त क्रिकेट खेळले होते. सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली होती. खासकरुन कर्णधार म्हणून दिलीप कुमार आणि राज कपूर संपूर्ण सामन्यात आपल्या टीमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत होते.