‘बाहुबली’ चित्रपटातील अभिनेता प्रभासची पिळदार शरीरयष्टी पाहून अनेकजण त्याच्या प्रेमात पडले. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक तरुणी कित्येक तास त्याच्या घराजवळ किंवा शूटिंगच्या सेटजवळ उभ्या असतात. प्रभासला पाहण्यासाठी त्या वाट्टेल ते करायला तयार असतात. अशा या प्रभासचे चाहते सर्वच क्षेत्रात पाहायला मिळतात. मग ते अभिनय क्षेत्र असो, क्रिकेट असो किंवा बॅडमिंटन. भारताची फुलराणी म्हणून ओळख मिळवलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवालसुद्धा प्रभासची खूप मोठी चाहती आहे. इन्स्टाग्रामवर तिने नुकताच पोस्ट केलेला फोटो पाहून ही गोष्ट तुमच्या लक्षात येईलच.
सायनाने हैदराबादमध्ये प्रभासची भेट घेतली असून त्याच्यासोबतचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ”बाहुबली’ प्रभाससोबत…’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
PHOTO : साध्या साडीला शिल्पा शेट्टीने दिला असा ‘ट्विस्ट’
हैदराबादमध्ये प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत भूमिका साकारणार आहे. तर नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.