बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सतत चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुखला तिन मुले आहेत. आर्यन खान, सुहाना खान आणि अब्राहम खान. शाहरुखसोबत त्याची मुलेही कायम चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एका जुन्या मुलाखतीमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखन मुलगा आर्यन खान विषयी बोलताना म्हणाला होता की, माझ्या मुलाने ती सगळी वाईट काम करावीत जी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही. ते ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
शाहरुखने १९९७ साली सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी आर्यनचा जन्म झाला होता आणि शाहरुखने पत्नी गौरी खानसोबत सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान शाहरुखला आर्यन विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते.
View this post on Instagram
‘आर्यन मोठा झाला की त्याने मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टींचा देखील अनुभव घ्यावा. ज्या गोष्टी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही त्या सर्व गोष्टींचा अनुभव त्याने घ्यावा. आर्यनने एक बॅड बॉय बनायला हवे आणि जर तो गूड बॉयसारखा वागू लगाल तर मी त्याला घरा बाहेर काढेन’ असे शाहरुख हसहत म्हणाला होता. पुढे तो विनोद करत म्हणाला, ‘माझी एक इच्छा आहे आर्यने अनेक मुलींना त्रास द्वावा. त्या मुलींचे पालक माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे.’
नुकताच आर्यनने कॅलिफोर्नीयामधून त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहरुखने आर्यनला अभिनेता नाही तर चित्रपट निर्माता व्हायचे असल्याचे सांगितले आहे.