सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव चर्चेत आहेत. या चर्चा त्या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या. आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. मात्र, या दोघांनी घटस्फोट का घेतला याचे कारण त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, “२०१९ मध्ये आमिर आणि किरण दोघेही भावनिकदृष्ट्या विभक्त झाले.” त्यात असेही सांगितले आहे की ‘बॉलिवूड इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार,”लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी आमिरसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर आमिर आणि फातिमा लग्न करणार या अफवा आहेत.”
आणखी वाचा : ‘…म्हणून मला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करायची गरज वाटत नाही’ : करीना कपूर
‘बॉलिवूड इनसाइडर’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आमिर आणि किरण हे दोघेही गेल्या काही वर्षात लग्न या संकल्पनेच्या पार पुढे निघून गेले होते. त्यांच्यात कोणतेच मतभेद किंवा वाद नव्हते. दोघांचे विचार आणि मूल्य सारखीच असली, त्यांच्या गरजा, आवडीनिवडी, आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोण, त्यांची मतं ही काळानुसार बदलत गेली. त्यात मग प्रेमही होतं आणि लग्नही. त्यामुळे केवळ मित्र म्हणून राहु शकतो, या निर्णयाप्रत ते दोघेही आले होते”, असं या वृत्तात म्हटलेलं आहे.
आणखी वाचा : ‘आपलीच मोरी आणि ***चोरी’, सरुआजींच्या त्या संवादामुळे देवमाणूस मालिका वादात
त्यात पुढे सांगण्यात आलं की, “आणि मग, आयुष्याच्या त्या टप्प्यावर वैवाहिक जीवनात काही समस्या असतील. तर एकत्र राहण्या पेक्षा वेगळे राहणे अधिक चांगले आहे. २०१९ मध्ये भावनिकरित्या विभक्त झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या सगळ्या प्रक्रियेला २ वर्ष लागली.”
किरणच्या आधी आमिरने रीना दत्ताशी लग्न केले होते. १६ वर्षांनंतर आमिर आणि रीना २००२ मध्ये विभक्त झाले. २००५ मध्ये किरण आणि आमिरने लग्न केले.