बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग महिन्याभरापूर्वी विवाहबंधनात अडकले. इटलीत राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडल्यानंतर नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी दोघांनी रिसेप्शनचं आयोजन केलं. या संपूर्ण समारंभानंतर आता दोघे पुन्हा आपापल्या कामकाजात व्यग्र झाले आहेत. दीपिकाने नुकतीच ‘फिल्मफेअर’ या प्रसिद्ध मासिकेला मुलाखत दिली आणि मुलाखतीत तिने रणवीरसोबतच्या नात्याविषयी बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या.

रणवीरसोबत आयुष्याची नवी सुरुवात करताना सासूबाईंनी तुला काही खास टिप्स दिल्या का असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर अत्यंत मजेशीर उत्तर देत ती म्हणाली, ‘नाही, मला टिप्स नाही दिल्या. पण इतकं नक्की सांगू शकते की रणवीर त्याचे आई-वडिल, बहीण यांच्यापेक्षा मला जास्त घाबरतो. कदाचित तो मला तशी वागणून देतो म्हणून तसं मला वाटत असेल. पण मी त्याच्या वागण्यावर पूर्ण विश्वास ठेवते. रणवीर किंवा त्याचे कुटुंबीय काही काम असल्यास सर्वांत आधी मलाच सांगतात आणि पुढेही त्यांनी मला सांगावं असं मला वाटतं.’

वाचा : रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये अकरा मराठी कलाकारांची फौज

लग्नानंतर रणवीर ‘सिम्बा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे तर दीपिकानेसुद्धा तिच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटासाठी तयारीला सुरुवात केली आहे.

Story img Loader