सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांमधील अंतर बरंच कमी झाले आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना अनेक प्रश्न विचारतात. कलाकारही अगदी उत्साहाने त्यांना प्रतिक्रिया देतात. नुकतेच ‘राबता’ फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूतने ‘लेट्स टॉक’ असे ट्विट केले. त्यावेळी चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले. सुशांतनेही सर्व प्रश्नांना आपल्या परीने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला एका चाहतीने असा काही प्रश्न विचारला, ज्यामुळे तो पेचात पडण्याची शक्यता होती. मात्र, सुशांतने मोठ्या चलाखीने या प्रश्नाचे उत्तर दिले.

वाचा : जेव्हा मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टमध्ये सलमानने अर्पिताला खांद्यांवर उचलून घेतलेलं

स्नेहल महाजन असे नाव असेलल्या एका ट्विटर युजरने सुशांतला, ‘तू माझ्याशी लग्न करशील का? गेल्या कित्येक वर्षांपासून माझं तुझ्यावर प्रेम आहे.’ असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने, ‘मला लग्नासाठी विचारण्याकरता तू एवढा वेळ का लावलास, मी याचीच तर वाट पाहत होतो’, असे उत्तर दिले.

अर्थातच, सुशांतचे हे उत्तर बऱ्याच नेटिझन्सना आवडले. त्याच्या ट्विटला जवळपास २०० पेक्षाही अधिक लाइक्स मिळाले. त्यानंतर त्या मुलीलाही राहवले नाही आणि तिने, ‘ओह माय गॉड, मला माफ कर. लव्ह यू.’, असे ट्विट केले.

वाचा : ना शाहरुख, ना सलमान; स्मृती मंधानाला ‘या’ बॉलिवूड स्टारला डेट करायचंय!

लवकरच सुशांत ‘केदारनाथ’ या अभिषेक कपूर दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सोहा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. याशिवाय, तो नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर. माधवन यांच्यासोबत ‘चंदा मामा दूर के’ चित्रपटातही झळकणार आहे.