सध्या टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘खतरो के खिलाडी’चे आठवे पर्व संपण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. जीव मुठीत घेऊन सेलिब्रिटींनी आपल्या मनातील भीतीवर मात करत केलेले टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. शेवटच्या टप्प्यावर असलेल्या या रिअॅलिटी शोचा विजेता कोण असणार हे जाणून घेण्याची आता प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, यंदाच्या पर्वाचा विजेता जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता तुम्हाला विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत थांबावे लागणार नाही.

वाचा : CONFIRMED ‘हे’ दोन सेलिब्रिटी दिसणार ‘बिग बॉस’च्या घरात

Gautam Gambhir Instagram post for Fan Girl
‘जोपर्यंत गंभीर हसत नाही…’ चाहतीच्या ‘त्या’ पोस्टरला गौतमने दिले उत्तर, इन्स्टाग्रामवर शेअर केलेला खास फोटो व्हायरल
Shakib Al Hasab Grabs Fans Neck who come to take a selfie
शाकिब अल हसनने सेल्फीची मागणी करणाऱ्या चाहत्याची पकडली मान; Video व्हायरल
rbi lifts bajaj finance restrictions on digital loan disbursement
बजाज फायनान्सच्या डिजिटल कर्ज वितरणावरील निर्बंध मागे
ipl 2024 shubman gill fan girl shaini jetani trolled fans saying she making gujarat titans captain lose his focus
“शुबमन गिल तुझ्यामुळे आउट होतोय”; चाहतीच्या ‘त्या’ VIDEO तील कृत्यांवर भडकले नेटिझन्स; म्हणाले, “स्वप्न…”
panvel sexual abuse marathi news,
पनवेल: शेजारच्याकडून बालिकेवर अत्याचार, उलव्यातील घटना
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर

‘खतरो के खिलाडी ८’च्या अंतिम फेरीत रवी दुबे, हिना खान आणि शांतनू महेश्वरी यांनी स्थान मिळवले. या तिघांपैकी कोणता सेलिब्रिटी विजेता ठरला हे जाणून घेण्याची उत्सुकता न ताणता तुम्हाला विजेत्याचे नाव सांगतो. तर डान्सर आणि ‘दिल दोस्ती डान्स’ फेम शातनू महेश्वरी हा ‘खतरो के खिलाडी ८’चा विजेता ठरल्याचे वृत्त आहे. शोच्या सुरुवातीपासूनच शांतनूने प्रत्येक स्टंटमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने एकदाही फिअर फंदा त्याच्या गळ्यात पडू दिला नव्हता. त्यामुळे अंतिम फेरीतील तीन स्पर्धकांपैकी शांतनू हा पहिला दावेदार असल्याचे सगळ्यांचेच मत होते.

वाचा : अभिषेकचा ‘या’ बहुचर्चित चित्रपटातून काढता पाय!

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका फेम हिना खानच्या चाहत्यांना यामुळे नक्कीच दुःख झाले असेल. हिनाच या पर्वाची विजेती असल्याचा तर्क सुरुवातीला लावला जात होता. मात्र, आता संपूर्ण चित्र बदलल्याचे दिसते. दरम्यान, अंतिम फेरीचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने शांतनू विजेता असल्याचे वृत्त दिले असून, ‘गोलमाल अगेन’ची संपूर्ण टीम या शोच्या सेटवर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी उपस्थित राहिल्याचे कळते.