बॉलिवूडमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्रींच्या नावांच्यायादीत बऱ्याच अभिनेत्रींच्या नावाचा समावेश होतो. अशाच अभिनेत्रींप्रमाणे बी टाऊनमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्यांचीही एक लांबलचक यादी आहे. या एव्हरग्रीन अभिनेत्यांपैकीच एक म्हणजे ‘झक्कास’ अभिनेता अनिल कपूर. ‘वो सात दिन’ या चित्रपटाद्वारे अनिल कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. पण, ते खऱ्या अर्थाने नावारुपास आले ते म्हणजे यश चोप्रा यांच्या ‘मशाल’ या चित्रपटातून. अभिनेता दिलीप कुमार यांच्यासह अनिल कपूरने ‘मशाल’ या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर अनिल कपूरने कधीही मागे वळून पाहिले नाही. ते आजही चित्रपटसृष्टीमध्ये त्यांच्या वाट्याला आलेल्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीचे श्रेय एका व्यक्तीला द्यायला कधीही विसरत नाहीत. आणि ती व्यक्ती म्हणजे गीतकार जावेद अख्तर. अनिल कपूर नेहमीच जावेद अख्तर यांच्या नावाचा उल्लेख करतात असे खुद्द शबाना आझमी यांनीच म्हटले आहे.

डीएनए ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अनिल कपूर आणि शबाना आझमी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अनिल कपूरविषयी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या होत्या की, अनिल कधीच चित्रपटसृष्टीतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी बोलताना जावेद अख्तर यांचा उल्लेख करायला विसरत नाही. जावेद अख्तर यांनीच यश चोप्रा यांच्याकडे त्यांच्या ‘मशाल’ या चित्रपटासाठी अनिल कपूरच्या नावाची शिफारस केली होती. किंबहुना जावेद अख्तर यांनी स्वत:च अनिल कपूरची ‘शोरिल’ बनविली होती.

Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Arun Govil Hema Malini BJP Rajput anger Uttar Pradesh
हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?

अभिनेते अनिल कपूर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. त्यांचा उत्साह आणि एकंदर शरीरयष्टी पाहिली तर ती एखाद्या तरुण आणि नव्या दमाच्या कलाकालाही लाजवेल अशीच आहे. सोशल मीडियावरही अनिल कपूर यांचे फोटो नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळवत असतात. अनिल कपूर या एव्हग्रीन अभिनेत्याने काही दिवसांपू्र्वीच वयाची साठ वर्षे पूर्ण केली होती. लंडनमध्ये एका खास पार्टीचे आयोजन करत अनिल कपूर यांचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी अनिल कपूर यांचे कुटुंबिय आणि मित्रमंडळी उपस्थित होते. येत्या काळात अनिल कपूर ‘मुबारकाँ’ या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटात अर्जुन आणि अभिनेता अनिल कपूर अशी काका-पुतण्याची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.