‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सिझनमध्ये अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत परखडपणे मतं मांडली होती. या वक्तव्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. इतकंच नाही तर या चॅट शोमध्ये करण जोहरवर तिने ‘मूवी माफिया’ अशी खोचक टीका केली होती. त्यानंतर बी-टाऊनमध्ये घराणेशाहीच्या वादाला तोंड फुटलं. काही मोठ्या कलाकारांनी घराणेशाहीचा विरोध केला तर जवळपास सर्वच स्टार किड्सनी आपली बाजू मांडली. घराणेशाहीचा मुद्दा सुरू असतानाच राज कपूर यांचा नातू आदर जैनला ‘यशराज’ लाँच करणार असल्याची माहिती समोर येतेय.

आदर जैन हा राजकपूर यांची मुलगी रिमा जैनचा मुलगा आहे. या स्टार किडला लाँच करण्याचा निर्णय ‘यशराज फिल्म्स’ने घेतला आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या ट्विटर हॅण्डलवरून आदर जैनचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. मात्र नेटीझन्सनी घराणेशाहीचा विरोध करत यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. नेटीझन्सनी घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे.

https://twitter.com/lordoftheshibs/status/882469200513581062

https://twitter.com/ShahidKaaFan/status/882567296056774656

https://twitter.com/sumit_roy_/status/882465141341667328

जाणून घ्या, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर्सची फी

‘यशराज फिल्म्स’च्या नव्या चित्रपटात आदर सोबत अन्या सिंग ही नवोदित अभिनेत्रीही पदार्पण करणार आहे. हबीब फैसल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून एका शोमध्ये अनुष्का आणि रणबीर कपूरने या दोघांचं लाँचिंग केलं. आदरचा मोठा भाऊ अरमानने २०१४ मध्ये ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.