‘ये रिश्ता क्या कहलता है’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहराची पत्नी अभिनेत्री निशा रावलने त्या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण म्हणाला की त्याच्यावर करण्यात आलेले आरोप हे आरोप चुकीचे आहेत.

करणने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे करणने सांगितले आहे. “आपल्या इतक्या वर्षांची मेहनत, लग्नाला इतकी वर्षे झाल्यानंतर हे सगळं होणं ही खूप वाईट गोष्ट आहे. गेल्या एक महिन्यापासून आम्ही या वर चर्चा करत आहोत. त्यानंतर विचार केला की आम्ही विभक्त झालं पाहिजे की दुसर काही केलं पाहिजे, मग आम्ही सगळ्या गोष्टींना ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो. निशाचा भाऊ रोहित सेठीसुद्धा या गोष्टी सुधारण्यासाठी आला होता, निशा आणि तिच्या भावाने पोटगीची रक्कम मागितली पण ती रक्कम इतकी होती की मी म्हणालो की हे माझ्यासाठी शक्य नाही, काल रात्रीही पोटगीबद्दल ते बोलत होते. त्यानंतर, रात्री दहा वाजता, ते माझ्याकडे आले, तेव्हा ही मी त्यांना सांगितले की हे माझ्याकडून शक्य होणार नाही,” असे करण म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

पुढे करण म्हणाला, “तिचा भाऊ म्हणाला तुम्ही लोक कायदेशीर पणे विभक्त व्हा, त्यानंतर मी ही म्हणालो की आम्ही कायदेशीरपणे विभक्त होऊ. मग मी माझ्या खोलीत आलो आणि माझ्या आईशी बोलत होतो तेवढ्यात निशा तिथे आली आणि तिने मला, माझे आई- वडील आणि माझ्या भावाला शिवीगाळ करु लागली. ती जोरात ओरडू लागली. एवढेच नाही तर निशा माझ्यावर थुंकली, मी निशाला बाहेर जाण्यास सांगितले, मग निशाने मला धमकावले, मी आता काय करते ते पहा, आणि मग ती बाहेर गेली आणि भिंतीवर डोक आपटू लागली आणि निशाने सर्वांना सांगितले की करणने हे केले आहे.”

आणखी वाचा : “मी तुझं करिअर संपवून टाकेन आणि…”, केआरकेचे सलमानला आव्हान

पुढे करण म्हणाला, “निशाचा भाऊ पुन्हा आला आणि त्याने पुन्हा माझ्यावर हात उगारला, निशाच्या भावाने माझ्याशी चुकीची वागणूक केली. त्यांनी मला चापट मारली आणि छातीवर देखील मारले. मी तिच्या भावाला सांगितले की मी निशाला मारले नाही आहे आणि तू घराच्या कॅमेऱ्यात हे तपासून बघ. परंतु कॅमेरे आधीच बंद करण्यात आले होते, त्यांनी सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरवात केली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला पण पोलिसांनी काहीही केले नाही कारण त्यांना काय सत्य हेच माहित नाही, जर आपण खोटी केस केली तर सत्य बाहेर येईल. उद्या जर चौकशी झाली तर सत्य नक्कीच समोर येईल.” करणला अटक केल्यानंतर काही वेळातच त्याची जामिन मंजूर झाली होती.