लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच ”ये जादू है जिन का” मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता विक्रम सिंह चौहानने देखील गर्लफ्रेंडशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहेत.

विक्रमने गर्लफ्रेंड स्नेहा शुक्लाशी २७ एप्रिल रोजी लग्न केले आहे. स्नेहा ही एक अभिनेत्री नसून पेशाने वकिल आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी तोंडाला मास्क लावले असल्याचे दिसत आहे.

विक्रमने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. ‘कुटुंबीयांचा आणि देवाचा आशिर्वाद घेऊन आम्ही लग्न केले आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे थाटात लग्न न करता काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितील आमचा लग्न सोहळा पार पडला आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी तुमचे मानापासून आभारा’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे. त्याच्या या पोस्टवर अभिनेत्री पूजा बनर्जी, अमार उपाध्याय, नामिक पॉल, डोनल बिष्ट, आशा नेगी, स्मिता बंसल अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.