छोट्या पड्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील सध्याची एक मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला.’ या मालिकेतील स्वीटू आणि ओमकार प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. ओमकारची भूमिका शाल्व किंजवडेकर आणि स्वीटूची भूमिका अन्विता फलटणकर साकारताना दिसत आहे. त्या अतिशय लोकप्रिय जोडीने नुकताच लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिट अड्डामध्ये हजेरी लावली. दरम्यान शाल्वने त्याच्या आवडी निवडी सांगितल्या आहेत. त्यावेळी त्याला पूरणपोळी आवडते की आईने बनवलेला पराठा असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शाल्वने काय उत्तर दिले हे पाहा व्हिडीओमध्ये-

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची कथा स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांभोवती फिरत आहे. तसेच एका गरीब घरातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी सध्या अतिशय लोकप्रिय आहे.