‘ओम शांती ओम’ या रिअॅलिटी शोमागोमाग योगगुरु रामदेव बाबा आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘सुपर डान्सर चॅप्टर २’ या डान्स रिअॅलिटी शोच्या मंचावर त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या येण्याने स्पर्धकांचाही उत्साहही द्विगुणित झाला होता. नेहमीच योगसाधनेचे महत्त्व सांगणाऱ्या रामदेव बाबांनी या कार्यक्रमात एका स्पर्धकाला अनोखी भेट दिली.
विशाल नावाच्या एका स्पर्धकाच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती मिळताच त्या मुलाला मदत म्हणून रामदेव बाबा यांनी चक्क त्याला भेट स्वरुपात एक गाय दिली. विशालच्या आईवडिलांनी त्याच्या भविष्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असणारी गाय विकली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे याच हेतूने त्यांनी विशालला ही गाय दिली.
वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्
. @yogrishiramdev ke saath dekhiye India ke anek rang Super Dancers ke khoobsurat Dance Performances ke roop mein, #SuperDancer Chapter 2 ke Colors of India special episode mein, iss weekend 9 baje.@TheShilpaShetty @basuanurag @geetakapur @rithvik_RD @Pparitosh1 pic.twitter.com/jRRqi4BhJ8
— sonytv (@SonyTV) December 15, 2017
रामदेव बाबांनी दिलेली ही भेट विशालच्या कुटुंबासाठी फारच मदतीची ठरेल यात शंकाच नाही. मुख्य म्हणजे रिअॅलिटी शोच्या मंचावर स्पर्धकाला मदत करण्यासोबतच त्यांनी योगसाधनेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टीही अनेकांना सांगितल्या. त्यावेळी परीक्षक शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू यांचा उत्साहसुद्धा ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले.