मॉडेल आणि अभिनेत्री वाणी कपूरने २०१३ मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पण त्यानंतर ती नंतर कोणत्याच सिनेमात दिसली नाही. साधारण तीन वर्षांच्या अंतराने ती रणवीर सिंगसोबत ‘बेफिक्रे’मध्ये दिसली. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नसले तरी ‘बेफिक्रे’ सिनेमाचा वाणीला फायदाच झाला. या सिनेमातून प्रेक्षकांना वाणीची खरी ओळख झाली. पण पुन्हा एकदा वाणी मोठ्या पडद्यापासून दूर झाली. ती कोणत्या गॉसिपमध्येही दिसली नाही. त्यामुळे तिने बॉलिवूडला राम राम ठोकला की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. पण तसे काही नाहीये.. रविवारी ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रेण्ड करत होती. वाणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फोटोशूटचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

टायरन वूडलीने अनोख्या अंदाजात मानले सलमानचे आभार

‘कॉस्मो गर्ल’ या मासिकासाठी तिने खास फोटो शूट केले होते. यात पाश्चात्य ड्रेसपासून ते पारंपारिक भारतीय साडीमध्ये वाणी खरंच फार सुंदर दिसतेय. सोशल मीडियावर चर्चेत कसे राहावे हे वाणीला आतापर्यंच चांगलेच कळले असे म्हणायला हरकत नाही. तिच्या याच फोटोंपैकी काही निवडक फोटो…

https://www.instagram.com/p/BWwl2HmhgTr/

https://www.instagram.com/p/BW4cjgDBLet/

दरम्यान काही दिवसांपूर्वी वाणीवर तिने ओठांची शस्त्रक्रिया केल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत वाणीने माझ्याकडे शस्त्रक्रिया करण्याएवढे पैसे नसल्याचे म्हटले होते. वजन कमी केल्यामुळे तिच्या चेहऱ्यात बदल झाल्याचे तिने म्हटले होते.

Story img Loader