दुसऱ्या पर्वातून खुणावताहेत संधीची दारे; स्पर्धेच्या प्रवेश अर्जासाठी मंगळवापर्यंतच मुदत
‘फुंतरू’ या सुजय डहाके यांच्या चित्रपटातील प्रतीक गंधे आणि निनाद गोरे, नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातील अनुजा मुळ्ये, ‘देवयानी’ मालिकेतील श्रीकांत भगत आणि पवन ठाकरे यांचा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या बातमीमध्ये संबंध काय असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. परंतु त्यांचा महाराष्ट्रातील या अव्वल दर्जाच्या पहिल्यावहिल्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेशी अगदी निकटचा संबंध आहे. कारण हे आहेत ‘लोकांकिका’च्या रंगमंचावरून अवतरलेले तारे.
‘लोकसत्ता लोकांकिका-२०१४’ स्पर्धेतील एकांकिकांमधील त्यांचा अभिनय गाजला. या स्पर्धेला आलेल्या मातब्बरांनी तो हेरला. आयरिस प्रॉडक्शन्स ही तर या स्पर्धेची टॅलेन्ट पार्टनरच. त्यांनी स्पर्धेतील या गुणवंतांना छोटय़ा पडद्यावर चमकण्याची संधी दिली. याच संधीची दारे आता राज्यातील विविध महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणाईला खुणावत आहेत.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी रंगमंचही सज्ज झाला आहे.
स्पर्धेच्या आठही विभागांतील स्पर्धा केंद्रेही जाहीर झाली असून २९ सप्टेंबरपासून राज्यभरात ही नाटय़धुमाळी सुरू होणार आहे. ‘झी मराठी नक्षत्र’ हे टेलिव्हिजन पार्टनर लाभल्याने विविध टप्प्यांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा आस्वाद जगभरातील रसिकांना घेता येणार आहे.
‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ९३.५ रेड एफएम हे रेडिओ पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना हेरण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन्स’ हे ‘टॅलेंट पार्टनर’ आहेत. यंदा ‘स्टडी सर्कल’ही या स्पर्धेत ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेमुळे राज्यातील अनेक कलाकारांना एकांकिकेत सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच राज्यातील नाटय़रसिकांसाठीही या स्पर्धेमुळे नाटय़ोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2015 रोजी प्रकाशित
तुम्हीही होऊ शकता ‘लोकांकिका’ तारे!
कारण हे आहेत ‘लोकांकिका’च्या रंगमंचावरून अवतरलेले तारे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 13-09-2015 at 06:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will be a super star