मुलांना आपल्या पालकांबाबत नेहमीच तक्रारी असतात. तेच पालक आपल्या मुलांना सुखी आणि आनंदी जीवन देण्यासाठी दिवस रात्र एक करत असतात. पण तरीही कोणत्या ना कोणत्या कारणांनी मुलं मात्र आपल्या आई- वडिलांच्या तक्रारी करतच असतात. तुम्हीही हे मान्य कराल हो ना? याला आपण घरोघरी मातीच्या चुली असंच म्हणू शकतो. जोवर मुलं स्वतः आई- बाबा होत नाहीत तोवर त्यांना आपल्या पालकांची परिस्थीती कळत नाही. त्यांच्यासाठी केलेल्या तडजोडीची जाण मुलांना तेव्हाच होते.

‘द कपिल शर्मा शो’मधील सुमोना व्यसनाधीन?

कुश या ट्विटर युजरने आपल्या पालकांचा राग ट्विटरवर काढला. आपल्या आई- वडिलांची तक्रार करणारी एक पोस्ट त्याने ट्विटरवर शेअर केली. मला जन्म दिल्याबद्दल माझ्या पालकांचा मला राग येतोय. ‘तुम्ही काय फक्त मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला? माझे बिल कोण भरणार? मी? मी स्वतःहून काही सांगितलं नव्हतं.’

कुशच्या या ट्विटला उत्तर देण्याचा विचार स्वतः अमिताभ बच्चन यांनी केला. कुशचे हे ट्विट पाहून एक पिता म्हणून बिग बी यांना नक्कीच वाईट वाटले असणार यात काही शंका नाही. त्यामुळेच त्यांनी कुशला त्याची चूक दाखवून देण्यासाठी स्वतः ट्विट केले. या ट्विटमध्ये अमिताभ यांनी लिहिले की, ‘तुझ्या पालकांना तुझ्या आजी आजोबांनी जन्म दिला. ते कधी बिल भरण्यावरून रडताना दिसले का?’

अमिताभ यांनी हे ट्विट केल्यानंतर कुशनेही त्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, तुमचा मान ठेवून मी सांगतो की हे मी फक्त उपहासात्मक बोललो होतो. आपण सर्वच आपल्या आई-वडिलांवर फार प्रेम करतो. त्यांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.’ कुशच्या या ट्विटनंतर मात्र त्याच्यावर टिकेची झोडच उठायला लागली.

‘दंगल’च्या २००० कोटी रुपयांच्या कमाईमागचे सत्य

अमिताभ सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. सद्य स्थितीवर प्रतिक्रिया देणं, चाहत्यांना आगामी सिनेमांबद्दल माहिती देणं हे नेहमीच अमिताभ करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचे फेसबुक पेज नीट सुरू होत नव्हते. याची तक्रारही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेली. लवकरच बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहेत.