आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील पराभवानंतर आता भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडीजविरोधात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. यामध्ये पहिल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकत १-० अशी आघाडी भारतीय क्रिकेट संघाने घेतली आहे. यादरम्यान भारतीय गोलंदाज झहीर खानला अभिनेत्री आणि होणारी पत्नी सागरिका घाटगेसोबत येथे सुट्ट्यांचा आनंद लुटतोय.

त्रिनिदादमध्ये झहीर आणि सागरिकाला एकत्र पाहिलं गेलं. सागरिकाने झहीरसोबतचा एक सेल्फीसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. या साखरपुड्याला भारतीय संघाचे अनेक माजी आणि आजी खेळाडू उपस्थित होते. विविध बॉलिवूड तारकांनीही हजेरी लावली होती. झहीर आणि सागरिकाला गोव्यात युवराज सिंगच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं.

वाचा : शाहरूखने अबरामला दिली ही ‘ईदी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही महिन्यांपासून झहीर आणि सागरिकामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या. पण, एप्रिल महिन्यात आयपीएल सुरु होण्यापूर्वी झहीरने ट्विट करून तो सागरिकाशी लग्न करणार असल्याची माहिती दिली. बोटात साखरपुड्याची अंगठी घातलेल्या सागरिकासोबतचा फोटो शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी दिली होती. या वर्षाअखेरपर्यंत हे प्रेमीयुगुल लग्न करणार असल्याचे कळते.