मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०१८ पुरस्काराची नामांकनं जाहिर झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी ‘फास्टर फेणे’, ‘ती सध्या काय करते’, ‘चि.व चि. सौ. का.’, ‘मुरांबा’ आणि ‘गच्ची’ या चित्रपटांमध्ये चुरस आहे. तर व्यावसायिक नाट्य विभागामध्ये ‘संगीत देवबाभळी’, ‘अनन्या’, ‘अशी ही श्यामची आई’, ‘वेलकम जिंदगी’ आणि ‘समाजस्वास्थ’ या नाटकांसाठी नामांकनं जाहीर झाली आहे.

प्रायोगिक नाटकांसाठीही नामांकनं जाहीर करण्यात आली असून ‘कोपनहेगन’, ‘वाय’, ‘शिकस्त- ए- इश्क’, ‘मून विदाऊट स्काय’ आणि ‘दोजख’ यांची निवड करण्यात आली आहे. मराठी चित्रपट विभागात वेशभूषा, रंगभूषा, कलादिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, पाश्र्वसंगीत, गीतकार, पाश्र्वगायिका, पाश्र्वगायक, कथा, पटकथा, संगीतकार, संवाद, बालकलाकार, विनोदी भूमिका, खलनायक, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, अभिनेत्री, अभिनेता, दिग्दर्शक आणि उत्कृष्ट चित्रपट अशा विविध विभागांत हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. नाटक विभागात (व्यावसायिक आणि प्रायोगिक) या सर्व पुरस्कारांबरोबरच प्रकाश योजना, नेपथ्य, लेखक आदींसाठीही पुरस्कार दिले जाणार आहेत.

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

VIDEO : गोविंदाच्या गाण्यावर जया बच्चन थिरकल्या

मराठी चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी पूजा सावंत (भेटली तू पुन्हा), सोनाली कुलकर्णी (हंपी), सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू), मिथिला पालकर (मुरांबा) आणि किरण धने (पळशीची पेटी) यांच्यामध्ये चुरस आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित प्रभाकर (चि. व चि. सौ. का.), वैभव तत्त्ववादी (भेटली तू पुन्हा), सचिन खेडेकर (बापजन्म), सुबोध भावे (हृदयांतर) आणि अमेय वाघ (फास्टर फेणे) यांना नामांकनं जाहीर झाली आहेत.

यावर्षी चित्रपट विभागासाठी स्वानंद किरकिरे, विद्याधर पाठारे आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर व्यावसायिक नाटक विभागासाठी राजन भिसे, योगेश सोमण, शेखर ढवळीकर यांनी आणि प्रायोगिक नाटक विभागासाठी विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी आणि इला भाटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.