प्रेक्षकांना लवकरच एका महापुरुषाची गाथा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच कळले होते. आजवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमांतून पाहिला. पण, टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा दाखविली जाणार आहे. झी मराठी वाहिनीवर ‘संभाजी’ ही मालिका लवकरच सुरु होणार असून, छत्रपती शिवाजी राजांच्या भूमिकेत याआधी झळकलेला अभिनेता डॉ. अमोल कोल्हे हा संभाजी राजांच्या भूमिकेत झळकणार आहे.

वाचा : BLOG चाहत्यांच्या प्रेमाचे उधाण आणि फॉलोअर्सचे विक्रमी लाईक्स

एका पत्रकार परिषदेत ‘संभाजी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हेचा लूक सादर करण्यात आला. संभाजी महाराजाची ओळख महाराष्ट्रातील तरूण जनतेला व्हावी यासाठी या मालिकेची निर्मिती करण्यात आल्याचे अमोल कोल्हेने पत्रकार परिषदेत सांगितले. मालिकेत जिजामाता यांची भूमिका अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर तर शंभूराजांच्या आईची म्हणजेच सईबाईंची भूमिका पूर्वा गोखले साकारणार आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या मालिकेचा विशेष दोन तासांचा भाग २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता या मालिकेचे प्रसारण सुरु होईल. त्यामुळे ‘काहे दिया परदेस’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

वाचा : विद्या बालनचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल

मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये सन १७०७ चा काळ दाखवण्यात आला असून त्यात औरंगजेबाच्या छावणीमधील एक दृश्य बघायला मिळते. जीवनाच्या अखेरच्या घटका मोजत असलेला औरंगजेब या दृश्यामध्ये, ‘संभाजीराजेंसारखा पुत्र असता तर त्याच्या खांद्यावर सगळी धुरा सोपवून मी निश्चिंतपणे जगाचा निरोप घेतला असता’, असे म्हणताना दिसतो.

Story img Loader