‘बिग बॉस ओटीटी’ हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. काल प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एका टास्क दरम्यान भांडण झालं आणि दोन स्पर्धक एकमेकांशी भिडले. हे दोन स्पर्धक प्रतीक सेजपाल आणि जीशान आहेत. त्यांचे हे भांडण पाहिल्यानंतर जीशानला ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. जीशानने बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याला झालेल्या दुखापतीते काही फोटो शेअर केले आहेत. हे पाहता त्याच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

जीशानने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जीशानने त्याच्या अंगावर असलेले निशान दाखवले आहेत. त्याच्या मानेवर आणि हातावर हे निशान दिसत आहेत. हे फोटो शेअर करत त्याने फक्त हात जोडण्याचे एक इमोटिकॉन कॅप्शन म्हणून दिले आहे. या व्यतिरिक्त त्याने कॅप्शनमध्ये काहीही दिलेले नाही. जीशानच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

आणखी वाचा : ‘अनुपमॉं’ फेम रुपाली गांगुलीचा बिकिनी अवतार, असा साजरा केला मुलाचा वाढदिवस

काल एका टास्कमध्ये प्रतीक आणि निशांत भटसोबत जीशानचा वाद झाला. यावेळी जीशानने निशांतकडून त्याच्या वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्या दोघांच्या वादात प्रतीकमध्ये आला आणि त्याने जीशानला हे करू नकोस असा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीशान ऐकत नाही. हे पाहिल्यानंतर प्रतिक आणि निशांत विरोधात मोर्चा काढतात आणि त्यानंतर हाणामारी होते. त्यानंतर बिग बॉसने जाहीर केले जीशानला घराबाहेर काढले जात आहे. हे पाहून जीशानची मैत्रीण दिव्या अग्रवार रडू लागते.

 

Story img Loader