‘बिग बॉस १४’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. निक्की सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे निक्कीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये निक्कीने नियॉन रंगाचं ब्लेजर परिधान केलं आहे. तिचा हा फोटो काही नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. पण काही नेटकऱ्यांनी तिला ब्रा परिधान केली नाही म्हणून ट्रोल केले आहे. तर दुसरीकडे निक्कीने हा फोटो शेअर करत “मला माहित आहे की मी सुंदर आहे. त्यामुळे मला कोणाच्या मताची गरज नाही”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘पावनखिंड’ साजरा करताय…; चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळता प्रतिसाद पाहता चिन्मय मांडलेकरने शेअर भावूक पोस्ट

आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

निक्कीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘या पेक्षा सगळचं दाखव.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सध्या नग्न असणं हा एक ट्रेंड बनला आहे. लोकांना संपूर्ण कपडे घालायची लाज वाटते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला कसली लाज आहे की नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘फक्त हेच बाकी राहिलं होतं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जे परिधान केलं आहेस ते पण काढून टाक’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी निक्कीला ट्रोल केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%9c%e0%a5%87 %e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8 %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%82 %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b8 %e0%a4%a4%e0%a5%87 %e0%a4%aa%e0%a4%a3
First published on: 03-03-2022 at 11:07 IST