सोशल मीडियावर सतत नवनवीन ट्रेण्ड्स येतच असतात. मग सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत या ट्रेण्ड्सची चर्चा होत असते. ‘किकी चॅलेंज’नंतर आता सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे ती ’10 Year Challenge’ (१० इअर चॅलेंज) या ट्रेण्डची. गेल्या काही दिवसांपासून #10YearChallenge हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या हॅशटॅगची भुरळ आता सेलिब्रिटींनाही पडली आहे. आता हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
स्वत:चा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो या हॅशटॅगअंतर्गत शेअर करून हे चॅलेंज (आव्हान) स्विकारलं जात आहे. २००९ आणि २०१९ अशा दोन्ही वर्षांतील फोटो शेअर करताना स्वत:मध्ये झालेल्या बदलांना सकारात्मकरित्या स्विकारण्याचा उद्देश या आव्हानामागे आहे.
https://www.instagram.com/p/BsprMfbn3zI/
https://www.instagram.com/p/BspkR1mAr2u/
https://www.instagram.com/p/BspHd3qBpyK/
https://www.instagram.com/p/BspKnQfHGvU/
#10yearchallenge pic.twitter.com/KwTbexKgYy
— emma lord (@dilemmalord) January 13, 2019
https://www.instagram.com/p/BsoogDXBtxr/
हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हे ’10 Year Challenge’ स्विकारलं आहे. डायना पेंटी, एकता कपूर, दिया मिर्झा यांनी स्वत:चे दहा वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.