१३व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन गुरुवारी १ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रविंद्र नाट्यमंदिरमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात इफ्फीमध्ये विशेष ज्युरी पारितोषिक मिळवणारे एक हजाराची नोटचे दिग्दर्शक श्रीहरि साठे आणि बंगलोर आंतरराष्ट्रीय महोत्सवात विशेष ज्युरी पारितोषिकाचे मानकरी यलो चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर चार दिगर्शकांनी दिग्दर्शित केलेला बायोस्कोप हा चित्रपटदेखील दाखविण्यात येणार आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी रविंद्र नाट्यमंदिर येथे दुपारी १ ते सायंकाळी ७ यावेळात उपलब्ध आहेत. १३व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात मराठी, हिंदी, इराणी भाषेतील चित्रपट पहावयास मिळतील.

Story img Loader