मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त अभिवाचन रजेवर (फलरे) आणखी चौदा दिवस बाहेर राहू शकत असल्याचे कारागृहाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांचा अद्याप अहवाल आलेला नाही. त्यांचा अहवाल संजय दत्त याच्या विरोधात गेला तर संजय दत्तला वाढीव रजा मिळणार नाही. पण, तोपर्यंत इतर कैद्यांप्रमाणे बाहेर राहू शकतो असे धामणे यांनी स्पष्ट केले.
येरवडा कारागृहातून संजय दत्त हा २४ डिसेंबर रोजी चौदा दिवसांच्या फलरेवर बाहेर पडला आहे. त्याच्या चौदा दिवसांची मुदत संपली तरी तो कारागृहात परला नाही. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. कारागृह प्रशासन संजय दत्तला झुकते माप देत असल्याचा जोरदार आरोप केला जात आहे.
याबाबत धामणे यांनी सांगितले, की संजय दत्त हा इतर कैद्यांप्रमाणे आम्हाला आहे. एखाद्या कैद्याला चौदा दिवसांची फलरेची सुट्टी मिळाल्यानंतर त्यामध्ये आणखी चौदा दिवसांची वाढ मिळते. मात्र, पहिल्या चौदा दिवसांमध्ये त्या कैद्यांने कायद्याचा भंग केल्याचा पोलिसांचा अहवाल आला, तर ती रजा मिळत नाही. संजय दत्तबाबत पोलिसांकडून अद्याप असा काही अहवाल आलेला
नाही. त्यामुळे इतर कैद्यांप्रमाणे तो सुद्धा बाहेर राहू शकतो.

Story img Loader