मराठी नाटय़निर्माता व्यावसायिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दीर्घाक’स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते ८ फेब्रुवारी २९१४ या कालावधीत दादर येथे यशवंत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. राज्यभरात विविध केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी १५ एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. नवीन लेखक, अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांचा शोध घेण्यासाठी संघाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
दररोज २ आणि शेवटच्या दिवशी ५ याप्रमाणे हे दीर्घाक सादर होणार आहेत. पहिल्या दिवशी (३ फेब्रुवारी) एका उत्तराची कहाणी (कलासिद्धी) व ओश्तोरिज (जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे) हे दीर्घाक सादर होणार आहेत. तर शेवटच्या दिवशी (८ फेब्रुवारी) आय विटनेस (अभिषेक थिएटर्स, महाड), रिअल इस्टेट (प्रयास, औरंगाबाद), मोडीत निघाले काडीमोड (राजाराम वाचनालय, नागपूर), तिचे संदर्भ नसलेली गोष्ट (नवरंग सांस्कृतिक कलामंच, सांगली) आणि दाभोळकरांच भूत (अध्ययन भारती, वर्धा) हे दीर्घाक सादर होणार आहेत. शेवटच्या दिवशी सकाळी साडेदहापासून स्पर्धा सुरू होणार असून अन्य दिवशी रात्री ८ आणि ९.४५ वाजता हे दीर्घाक सादर होतील.
स्पर्धेत अन्य दिवशी सादर होणाऱ्या एकांकिका पुढीलप्रमाणे
*४ फेब्रुवारी/ यो अस्मान द्वेष्टी (तिहाई कलासाधक संस्था, डोंबिवली), एन्ड ऑफ सिझन (यवनिका थिएटर्स)
*५ फेब्रुवारी/ मोठी तिची सावली (मिथक, मुंबई), घोसाळकर गुरुजी (मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव)
*६ फेब्रुवारी/ ओसरला पुणे (आसक्त, पुणे), चुळबुळ (सुरप्रवाह, वरळी)
*७ फेब्रुवारी/ चॉकलेटचा बंगला (गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे), इश्वर साक्ष (स्नेह, पुणे)
नाटय़निर्माता संघाच्या ‘दीर्घांक’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत १५ एकांकिका
मराठी नाटय़निर्माता व्यावसायिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दीर्घाक’स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते ८ फेब्रुवारी २९१४ या कालावधीत दादर येथे यशवंत नाटय़ मंदिर
First published on: 29-01-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 one act plays in dirghangi competition final