पंधरावा ‘आयफा’ (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी) पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच अमेरिकावारी करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदी चित्रपटसृष्टीचा ठसा उमटावा या हेतूने दरवर्षी विविध देशांतून ‘आयफा’ पुरस्कार सोहळयाचे आयोजन केले जाते. या वर्षी २४ ते २६ एप्रिल दरम्यान हा पुरस्कार सोहळा फ्लोरिडातील ताम्पा बे येथे होणार आहे. ‘आयफा’ पुरस्कारांचे अमेरिकेत होणारे वितरण हा आमच्यासाठी एकीकडे कौतुकाचा आणि तितकाच रोमांचकारी असा अनुभव असणार आहे. ताम्पा बे हे ठिकाण महोत्सवासाठी एकदम सुंदर ठिकाण असून यंदा आठवडाभर रंगणाऱ्या सोहळ्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली असल्याचे ‘विझक्राफ्ट’चे संचालक अँड्रे टिमिन्स यांनी म्हटले आहे. अमेरिकेत हा सोहळा व्हावा, अशी कित्येक दिवसांपासूनची मागणी होती. त्या मागणीचा पाठपुरावा करूनच फ्लोरिडातील ताम्पा बे हे ठिकाण आणि एप्रिल महिन्यातील तारखा महोत्सवासाठी निश्चित करण्यात आल्याचे टिमिन्स यांनी सांगितले.

Story img Loader