आलिया भट आणि अर्जुन कपूर यांच्या ‘२ स्टेट्स’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३८ कोटींचा गल्ला जमविला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १२.४२ कोटींची कमाई केली होती. व्यापार विश्लेषक तरन आनंदने हा आकडा ट्विट करत चित्रपट सुपर हिट असल्याचे म्हटले होते.
‘२ स्टेट्स’ने पहिल्या आठवड्यात चांगलीच कमाई केली आहे. शुक्रवार- १२.४२ कोटी, शनिवार- १२.१३ कोटी, रविवार- १३.५१ कोटी असा एकूण मिळून ३८.०६कोटींचा गल्ला चित्रपटाने जमविला आहे. सलमानच्या ‘जय हो’ आणि रणवीर, अर्जुनच्या ‘गुंडे’ चित्रपटानंतर सुरवातीच्याच आठवड्यात विक्रमी कमाई करणारा हा २०१४ सालातील तिसरा चित्रपट आहे. भारतात तब्बल २००० स्क्रीन आणि परदेशात ३० देशांमध्ये ३५० स्क्रीनवर ‘२ स्टेट्स’ प्रदर्शित करण्यात आला आहे.

Story img Loader