बॉलीवूडचे रॉकस्टार रणवीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे आगामी ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ मध्ये ६०च्या दशकातील मुंबई दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाला जास्तीत जास्त वास्तववादी रुप देण्यासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यपचे जोरात प्रयत्न सुरु आहेत. अनुराग या चित्रपटासाठी श्रीलंकेतून २०० विंटेज गाड्या मागवणार आहे. यापूर्वी, कोणत्याच बॉलीवूड चित्रपटात इतक्या मोठ्या प्रमाणात विंटेज गाड्यांचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनुराग एक नवा रेकॉर्डचं करत आहे असं म्हणायला हवं. श्रीलंकेत सर्वाधिक विंटेज गाड्या उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे या चित्रपटात निर्माता-दिगदर्शक करण जोहर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि फॅन्टम फिल्म्सची निर्मिती असलेला ‘बॉम्बे वेल्वेट’ २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा