अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध ‘हिट अँड रन’ खटल्याच्या सुनावणीला सोमवारपासून नव्याने सुरूवात करण्यात आली. सत्र न्यायालयात सोमवारी या खटल्यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. सांबा गौडा या साक्षीदाराने पोलिसांनी पंचनाम्यात नमूद केलेल्या वस्तुंची ओळख पटल्याची साक्ष न्यायालयासमोर दिली. तसेच अपघाताच्या दिवशी घटनास्थळावर नेमकी कशी परिस्थिती होती याबद्दलसुद्धा त्याने न्यायालयाला माहिती दिली. अभिनेता सलमान खान याच्यावर २८ सप्टेंबर २००२ रोजी वांद्रे येथे आपल्या लँड क्रुझर या वाहनाने पदपथावर झोपलेल्या व्यक्तींना चिरडल्याचा आरोप आहे. यापैकी चार जण जखमी झाले होते आणि एकाचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी सलमान खानविरूद्ध न्यायालयात खुनाच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीविरुद्ध असणाऱ्या खुनाच्या आरोपांसंदर्भात साक्षीदारांची योग्यप्रकारे तपासणी न झाल्याचे सांगत न्यायालयाने मागील वर्षी ५ डिसेंबर रोजी हा खटला नव्याने चालविण्याचे आदेश दिले होते.

Story img Loader