राजीव रॉय दिग्दर्शित ‘मोहरा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आजही यातील ‘टिप टिप बरसा पानी’, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ ही गाणी प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. या चित्रपटामुळे अक्षय कुमार, रवीना टंडन ही जोडी सुपरहिट ठरली. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी रवीना ही पहिली पसंत नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री दिव्या भारतीने पदार्पणाच्या काही वर्षांतच सुपरस्टार म्हणून ओळख मिळवली होती. केवळ तिच्या अभिनयावरच लोक भाळले नव्हते. तर तिच्या सौंदर्यावरही अनेकजण घायाळ झाले होते. त्यावेळी निर्माते दिव्याला आधीच चित्रपटासाठी साइन करून घेत होते. त्याचमुळे, दिव्याच्या निधनानंतर तिने साइन केलेले अनेक चित्रपट अर्धवटच राहिले. शेवटी दिग्दर्शकांना दुसऱ्या अभिनेत्रींसोबत पुन्हा चित्रीकरण करावं लागलं. दिव्याचे बरेचसे चित्रपट नंतर हिट ठरले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘मोहरा’.

खूप कमी जणांना माहित असेल की, ‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांनी सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून दिव्याला चित्रपटात घेतले होते. तिने या चित्रपटातील काही दृश्यंही चित्रीत केली होती. पण, त्याच दरम्यान आलेल्या दिव्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. राजीव रायचा ‘मोहरा’ शेवटी अर्ध्यावरच लटकला. त्यानंतर नव्या हिरोईनचा शोध घेत असताना राजीव रायने रविना टंडनला चित्रपटात घेतले. त्यावेळी रविना बरीच चर्चेत होती. तेव्हा ती चित्रपटसृष्टीत नवीन होती. पण तिच्या पदार्पणातील चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळालेली. तिचा ‘दिलवाले’ चित्रपट हिट झाला होता.

१९९४ मध्ये ‘मोहरा’ प्रदर्शित झाला आणि त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तो दुसरा चित्रपट होता. पुरस्कार सोहळ्यांमध्येही या चित्रपटाने नाव कमविले. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला नऊ नामांकन मिळाली होती. रविनाच्या अभिनयाचीही बरीच प्रशंसा झाली होती. ‘मोहरा’ च्या यशाने रविनाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले. त्यानंतर ती अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकली.