सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा ‘अतरंगी रे’ चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे ट्रेलरमधील सारा अली खानच्या अभिनयाची सोशल मीडियावर प्रशंसा केली जात आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारला ट्रोल केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या ३ मिनिटे आठ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषचे अपहरण करुन साराशी लग्न करण्यासाठी आणण्यात आल्याचे दाखवले आहे. पण सारा लग्नाला तयार नसते. कुटुंबीय जबदरस्तीने साराचे लग्न धनुषशी लावून देतात. त्यानंतर सारा आणि धनुष दिल्लीला जातात. दरम्यान, हळूहळू त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि त्याचवेळी अक्षय कुमारची एण्ट्री होते. साराचे अक्षयवर प्रचंड प्रेम असते. चित्रपटातील काही सीन्समध्ये अक्षय आणि साराचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केले आहे.
Video: ‘दादा परत या ना, हसवा ना…’, भाऊ कदमच्या ‘पांडू’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

आणखी वाचा : एका किसिंग सीनसाठी कार्तिक आर्यनला द्यावे लागले होते ३७ रि-टेक
सारा अली खान आणि अक्षय यांच्यामध्ये जवळपास २८ वर्षांचे अंतर आहे, त्या दोघांचा रोमान्स प्रेक्षकांच्या फारसा पसंतीला उतर नसल्याचे दिसत आहे. एका यूजरने कमेंट करते ‘हे तर तू तुझ्या मुलीसोबत रोमान्स केल्यासारखं झालं. तू सैफसोबत काम केले आहेस आणि तो तुझ्या भावासारखा आहे. थोडे काही वाटले पाहिजे’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘सारा अक्षयसोबत का रोमान्स करत आहे’ अस म्हटेल आहे.

‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती. हा चित्रपट २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.