भारतीय चित्रपटांच्या शताब्दी निमित्ताने गतवर्षीपासून प्रभातने मराठी चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणा-या प्रभात पुरस्कारांची घोषणा केली. प्रभातची नाममुद्रा व निवड प्रक्रियेतील वेगळेपण यामुळे प्रभात पुरस्कारांनी सध्याच्या पुरस्कारांच्या भाऊगर्दीतही पहिल्याच वर्षी आपले एक मानाचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे.
यंदाच्या पुरस्कारांसाठी २०१३मध्ये सेन्सॉर संमत झालेल्या ५९मराठी चित्रपटांनी आफल्या प्रवेशिका दाखल केल्या होत्या. निवड समिती व परिक्षकांनी संभाव्य विजेत्यांची नावांची यादी जाहीर केली आहे. या चित्रपटांचा २रा प्रभात पुरस्कार चित्रपट महोत्सव शुक्रवार २मे ते ८मे पर्यंत प्रभात टॉकीज पुणे येथे रोज सायंकाळी ६वाजता आयोजित करण्यात आला आहे. यात अनुक्रमे ७२ मैल एक प्रास, दुनियादारी, रेगे, अस्तु, फॅड्री, यलो आणि आजचा दिवस माझा हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
२रा प्रभात पुरस्कार चित्रपट महोत्सव
भारतीय चित्रपटांच्या शताब्दी निमित्ताने गतवर्षीपासून प्रभातने मराठी चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणा-या प्रभात पुरस्कारांची घोषणा केली.
First published on: 02-05-2014 at 02:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2nd prabhat award film festival