२००७ मध्ये आलेल्या झॅक स्निडर दिग्दर्शित ‘३००’ या हॉलिवूडच्या चित्रपटाचा सिक्वेल ‘३००: राईज ऑफ अन् एम्पायर’ येऊ घातला आहे. ‘३००: राईज ऑफ अन् एम्पायर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये सुल्लिव्हन स्टेपलटन हा स्पार्टन सैन्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पर्शियाच्या नौदलाशी दोन हात करताना दिसणार आहे.
रॉड्रीगो सँटोरो झेर्सेसच्या भूमिकेत दिसणार असून, लिना हेअडी स्पार्टाच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कसिनो रॉयल’ चित्रपटाचा स्टार इव्हा ग्रीन आणि हंस मॅथिवसन हे देखिल ‘३००’ चित्रपटाच्या या दुसऱ्या भागामध्ये दिसणार आहेत. या वेळी नोअम मुरो दिग्दर्शकाच्या खुर्चीमध्ये बसले आहेत. ‘३००: राईज ऑफ अन् एम्पायर’ हा चित्रपट ७ मार्च २०१४ला प्रदर्शित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.         

Story img Loader