जे प्रस्थापित आहेत त्याच्यावर पैसा लावण्यात धोका कमी आणि नफा जास्त असतो. आजघडीला टेलिव्हिजन आणि सिनेजगतासाठी हा मूलमंत्र ठरला आहे. चित्रपट कलाकारांना टीव्हीवर मोठी मागणी आहे. मग तो रिअॅलिटी शो असो नाही तर बिग बजेट चित्रपट. बॉलिवूडमध्ये नावाजलेले चेहरे घेतले म्हणजे हमखास टीआरपी मिळणार हे आर्थिक समीकरण कलाकार आणि टीव्ही इंडस्ट्री दोघांसाठी इतके चपखल आणि फायद्याचे ठरले आहे की त्यांच्यासाठी कितीही पैसे मोजायला ही मंडळी तयार आहेत. या समीकरणाचा पहिला लाभ झाला होता तो ‘दबंग’ सलमान खानला. सलमानने याच बळावर रिअॅलिटी शो, जाहिराती आणि आपल्या चित्रपटांचे प्रसारण यासाठी बक्कळ पैसे घेतले. सलमानपाठोपाठ चित्रपटांच्या प्रसारणासाठी स्टार इंडियाबरोबर ४०० कोटी रुपयांचा करार करत अजयने आपण इथेही ‘सिंघम’ असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क वाटेल त्या किंमतीला विकत घेण्याची टूम टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सुरू झाली आहे. या चित्रपटांना मोठा टीआरपी असल्यामुळे प्रदर्शनाआधीच कोणकोणते चित्रपट घ्यायचे, यासाठी वाहिन्यांमध्ये चुरस असते. सलमानपाठोपाठ गेल्या दोन वर्षांत सलग हिट चित्रपट देणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोणत्याही वाहिनीवर चित्रपटाला सरासरी २.५ एवढा टीआरपी मिळाला तरी तो यशस्वी मानला जातो. अजय देवगणसाठी बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘बोलबच्चन’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटांनी यश मिळवून दिले असले तरी टेलिव्हिजनवर त्याला ४०० कोटीचे घबाड मिळवून देण्यासाठी लाभदायी ठरला आहे ‘सन ऑफ सरदार’. या चित्रपटाने आत्तापर्यतचा सर्वाधिक म्हणजे ५.१ एवढा टीआरपी मिळवल्यामुळे स्टार वाहिनीने अजयला पुढच्या चित्रपटांसाठी करारबध्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, अजयच्या आगामी ‘हिम्मतवाला’, प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’चा सिक्वलपट अशा चांगल्या चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क स्टार इंडियाने ४०० कोटी रुपये मोजून विकत घेतले आहेत.
या कराराबद्दल बोलताना अजयने आपली भूमिका ही माझ्या निर्मात्याला आणि स्वत:लाही पैसा मिळवून द्यावा ही असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या चित्रपट व्यवसाय विविध अंगांनी फोफोवतो आहे. ‘या करारामुळे माझ्या निर्मात्यांना फायदा मिळणार आहे. बऱ्याचदा निर्माते आपल्या चित्रपटाचा निर्मिती खर्च वसूल करण्याकरता सॅटेलाईट हक्कांच्या विक्रीतून जमा होणाऱ्या रक्कमेवर अवलंबून असतात. त्यामुळे या कराराचा जास्तीत जास्त फायदा त्यांना मिळणार आहे आणि अर्थातच मलाही मिळणार आहे. कारण, यातला नफा हा तुम्ही आणि तुमचा निर्माता यांचे संबंध किती चांगले आहेत, त्यावरही अवलंबून असतो’, असे अजयने स्पष्ट केले. मालिकांबरोबरच चित्रपटांमधून टीआरपी जास्त मिळतो, हे लक्षात आल्यानेच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या किंवा ठरतील अशा चित्रपटांसाठी लागेल ती किंमत मोजण्याची वाहिन्यांची तयारी आहे.
‘टीआरपी’चे ४०० कोटी!
जे प्रस्थापित आहेत त्याच्यावर पैसा लावण्यात धोका कमी आणि नफा जास्त असतो. आजघडीला टेलिव्हिजन आणि सिनेजगतासाठी हा मूलमंत्र ठरला आहे. चित्रपट कलाकारांना टीव्हीवर मोठी मागणी आहे. मग तो रिअॅलिटी शो असो नाही तर बिग बजेट चित्रपट.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-03-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 400 crores of trp