Apple या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने आपले भारतामधील पहिलेवहिले स्टोअर मुंबईमध्ये सुरू केले आहे. मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे स्टोअर सुरू करण्यात आले असून त्याचे मंगळवार (१८ एप्रिल) उद्घाटन झाले आहे. विशेष म्हणजे या उद्घाटन कार्यक्रमाला अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी हजेरी लावली होती. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरु झालेल्या या अ‍ॅपल स्टोअरचे महिन्याचे भाडे किती आहे माहिती आहे का तुम्हाला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- VIDEO: देशातील पहिले Apple चे रिटेल स्टोअर मुंबईत झाले सुरु, CEO टीम कुक यांनी केले ग्राहकांचे स्वागत

‘रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉल’ मध्ये असलेले अ‍ॅपल कंपनीचे स्टोअर खूपच प्रभावी आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की ऊर्जा कार्यक्षम डिझाइनमध्ये तयार केलेल्या या स्टोअरचे मासिक भाडे ४२ लाख आहे. अहवालानुसार, मुंबईतील अंबानींच्या मालकीच्या मॉलने अॅपलसोबत सुमारे २०,८०० स्क्वेअर फूट जागेसाठी ११ वर्षांचा करार केला आहे. दर तीन वर्षांनी स्टोअरच्या भाड्यात १५ टक्के वाढ केली जाईल आणि कंपनी पहिल्या तीन वर्षांसाठी २ टक्के महसूल वाटा योगदानासह ४२ लाख रुपये मासिक भाडे देईल.

हेही वाचा- “Apple वरील निष्ठा…” अ‍ॅपल स्टोअरच्या उद्घाटनाला आलेल्या व्यक्तीच्या हातातील ‘ती’ वस्तू पाहून CEO झाले थक्क

याआधी भारतातील नियमांमुळे अ‍ॅपल कंपनीला येथे स्वत:चे स्टोअर सुरू करण्यास अडचणी येत होत्या. याच कारणामुळे ‘इमॅजीन’, ‘फ्यूचर वर्ल्ड’ यांसारख्या भागीदारांसोबत अ‍ॅपल कंपनीने येथे स्टोअर सुरू केले होते. मात्र आता अ‍ॅपलने भारतात स्वत:चे स्टोअर सुरू करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मुंबईत पहिले स्टोअर सुरू झाले असून दुसऱ्या स्टोअरचे उद्घाटन दिल्लीमध्ये २० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या स्टोअरच्या माध्यमातून अ‍ॅपल कंपनी भारतामध्ये उत्पादन आणि विक्री क्षेत्रामध्येही उतरली आहे. अ‍ॅपल भविष्यात देशात १० लाख नोकऱ्या निर्माण करणार आहे. तसा दावा अ‍ॅपल कंपनीने केला आहे. मुंबईत सुरू करण्यात आलेले स्टोअर हे खुद्द अ‍ॅपल कंपनीच्या मालकीचे आहे. त्यामुळे ग्राहक आता भारतात निर्मिती झालेल्या अ‍ॅपलच्या उत्पादनांना थेट खरेदी करू शकणार आहेत.

हेही वाचा- Apple First Retail Store Opening: मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरबद्दल जाणून घ्या ‘या’ १० प्रमुख गोष्टी

अ‍ॅपलचे दुसरे स्टोअर दिल्लीत उभारणार

Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे. २० एप्रिल पासून ग्राहक सकाळी १० वाजल्यानंतर या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच Apple चे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा थर्ड पार्टी स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.