बॉलीवूडमध्ये नावाजलेल्या मूळच्या बंगालच्या पाच अभिनेत्रींचा सत्कार करण्यात येणार आहे. मौसमी चॅटर्जी, सुष्मिता सेन, राणी मुखर्जी, बिपाशा बासू आणि कोंकणा सेन शर्मा या बंगाली सौंदर्यवतींचा गौरव पश्चिम बंगाल सरकार करणार आहे. या कार्यक्रमाला पाच कन्या असे नाव देण्यात आले आहे. मौसमी चॅटर्जी, सुष्मिता सेन, बिपाशा बासू या तिघींनीही कार्यक्रमास उपस्थित राहू असे कळवले असून, राणी मुखर्जी आणि कोंकणा सेन शर्मा यांच्या होकाराची वाट आयोजक पाहत आहे. त्यादेखील उपस्थित राहण्यास लवकरच होकार देतील, अशी आशा आयोजकांना आहे. हा सत्कार कोलकाता आंतरष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभाचे विशेष आकर्षण असणार आहे. चित्रपट समारोहाच्या सांगता समारंभात १७ नोव्हेंबर रोजी, कोलकाताच्या सायन्स सिटी ऑडीटोरियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
बॉलीवूड बंगाली सौंदर्यवतींचा पश्चिम बंगाल सरकारकडून सत्कार
बॉलीवूडमध्ये नावाजलेल्या मूळच्या बंगालच्या पाच अभिनेत्रींचा सत्कार करण्यात येणार आहे.
First published on: 05-11-2013 at 11:04 IST
TOPICSबिपाशा बासू
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 bollywood bangali beuties homage by bangal government