मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘फग्ली’ या विनोदी चित्रपटानंतर आता वेध लागले आहेत ते साजिद खानच्या ‘हमशकल्स’ या विनोदी चित्रपटाचे. चित्रपटकर्त्यांकडून चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोणतीही संधी सोडण्यात आलेली नाही. ‘हमशकल्स’ हा चित्रपट आपण कोणत्या कारणांसाठी पाहू शकता याची कारणमिमांसा येथे देत आहोत.
१) तिप्पट मजा – ‘हमशकल्स’ चित्रपटातील मुख्य अभिनेते सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर तीन-तीन भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे, चित्रपटातील व्यक्तिरेखांमध्ये निर्माण होणारा गोंधळ आणि संभ्रम प्रेक्षकांना नक्कीच हसायला लावणार असल्याचे दिसते.
२) ग्लॅमरस अभिनेत्री – बिपाशा बसू, तमन्ना भाटिया आणि इशा गुप्ता चित्रपटातील या सुंदर आणि आकर्षक अभिनेत्री चित्रपटाची जमेची बाजू आहेत.

३) स्त्री भूमिकेत अभिनेते – सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर चित्रपटातील या तीन अभिनेत्यांची स्त्रीवेषातील धमाल-मस्ती पाहणे म्हणजे निखळ मनोरंजन असणार आहे.

४) नयनरम्य स्थळे – मॉरिशसचे सुंदर समुद्र किनारे आणि लंडन शहरासारख्या प्रेक्षणीय स्थळी चित्रपटाचे चित्रीकरण झाले असल्याने हा चित्रपट पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी नयनरम्य स्थळांची मेजवानीच असणार आहे.
५) चित्रपटाचे संगीत – ‘हमशकल्स’ चित्रपटाच्या संगीताचा मुख्य भाग हिमेश रेशमियाने तयार केला असून, मिका सिंग, शाल्मली कोलघडे आणि निती मोहन यांच्याबरोबर त्याने स्वत:देखील गाणी गायली आहेत.

Story img Loader