३० ऑगस्ट रोजी रात्री ६७ व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी रणवीर सिंगला ‘८३’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. विकी कौशलला ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (क्रिटिक्स) पुरस्कार देण्यात आला आणि विद्या बालनला ‘शेरनी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला.
VIDEO: महेश बाबूची मुलगी सितारा ‘DID तेलुगू’च्या मंचावर थिरकली; अभिनेता कौतुकाने म्हणाला…
त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘शेरशाह’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. हा अवॉर्ड शो रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरने होस्ट केला होता. कतरिना कैफ, करण जोहर, क्रिती सेनॉन, शहनाज गिल यांनी रेड कार्पेटची शोभा वाढवली. तर, विद्या बालन, वरुण धवन, सिद्धार्थ रॉय कपूर, तापसी पन्नू, अनुप जलोटा, शबाना आझमी, जावेद अख्तर, जॅकी श्रॉफ, संजीव कपूर, शर्वरी, नील नितीन मुकेश, अक्षय ओबेरॉय, रणवीर सिंग, रुपाली गांगुली, तुषार कपूर, एस. शेट्टी, कबीर बेदी, हरनाज संधू, मनीष मल्होत्रा, अनु मलिक आणि तनुश्री दत्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी या अवॉर्ड शोला हजेरी लावली. यापैकी अनेक स्टार्सनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देऊन कार्यक्रम आणखी मनोरंजक केला.
“सारा अली खानला तुरुंगात टाका”; ‘या’ व्यक्तीची मागणी, नेमकं घडलं काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ६७ व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराची घोषणा सुरू झाली.
पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट चित्रपट : शेरशाह
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स): सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट गीत: कौसर मुनीर ‘83’ मधील ‘लेहरा दो’ गाण्यासाठी
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: सुभाष घई
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी प्राक (शेरशाहमधील ‘मन भरेया’ गाण्यासाठी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : शर्वरी वाघ (फिल्म ‘बंटी और बबली २’)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता: एहान भट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : सीमा पाहवा ‘रामप्रसाद की तेहरवी’ चित्रपट
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले: शुभेंदु भट्टाचार्य आणि रितेश शाह ‘सरदार उधम’ चित्रपट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: सई ताम्हणकर ‘मिमी’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी