मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेता अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तर याच चित्रपटासाठी अजय देवगणलाही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. अजय देवगणचा हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटात अजय देवगणने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तर ‘तुलसीदास ज्युनिअर’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याशिवाय सायना चित्रपटासाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला.

मराठी चित्रपटांच्या विभागात विभागात अभिनेत्री सायली संजीवच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘मी वसंतराव’साठी गायक राहुल देशपांडेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त विशेष उल्लेखनीय फिचर फिल्मसाठी सिद्धार्थ मेननच्या ‘जून’, तर किशोर कदम यांच्या ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांचित’ या चित्रपटांची निवड करण्यात आली.

इथे पाहा संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट(हिंदी)- तान्हाजी: द अनसंग वॉरियर
सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी)- तुलसीदास ज्युनिअर
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अजय देवगण (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट(मराठी)- गोष्ट एका पैठणीची
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म-
१. जून- सिद्धार्थ मेनन
२. गोदाकाठ आणि अवांचित- किशोर कदम
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- राहुल देशपांडे- मी वसंतराव
सर्वोत्कृष्ट बालकलाकार चित्रपट(मराठी)- सुमी
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
१. अनिश गोसावी- टकटक
२. आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर- सुमी
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- फनरल (मराठी )

चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.