69th National Film Awards Ceremony : आज दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या वर्षी २४ ऑगस्ट रोजी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज मंगळवारी (१७ ऑक्टोबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

Live Updates

69th National Film Awards : राष्टीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यातील सर्व अपडेट्स

16:36 (IST) 17 Oct 2023
वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.

https://platform.twitter.com/widgets.js

16:21 (IST) 17 Oct 2023
अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'पुष्पा: द राइज'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

https://platform.twitter.com/widgets.js

16:19 (IST) 17 Oct 2023
आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

https://platform.twitter.com/widgets.js

16:15 (IST) 17 Oct 2023
आलिया भट्टने स्वीकारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा चित्रपट देण्यात आला.

16:15 (IST) 17 Oct 2023
क्रिती सेनॉनने स्वीकारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

अभिनेत्री क्रिती सेनॉनने 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

https://platform.twitter.com/widgets.js

16:11 (IST) 17 Oct 2023
श्रेया घोषालला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार

गायिका श्रेया घोषाल हिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'इरावीन निऱ्हाळ' चित्रपटातील 'मायावा छायावा' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला.

https://platform.twitter.com/widgets.js

16:06 (IST) 17 Oct 2023
प्रेम रक्षितला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार

नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षितला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'आरआरआर'साठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

https://platform.twitter.com/widgets.js

16:05 (IST) 17 Oct 2023
शील कुमार यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा अवॉर्ड

निर्माते शील कुमार यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सरदार उधम'साठी सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

https://platform.twitter.com/widgets.js

15:57 (IST) 17 Oct 2023
‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक सलील कुलकर्णींनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

15:15 (IST) 17 Oct 2023
लग्नातील साडी नेसून पुरस्कार घ्यायला पोहोचली आलिया भट्ट, म्हणाली...

आलिया भट्ट तिच्या लग्नातील साडी नेसून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायचा पोहोचली. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/CyfqcAmPbGO/?utm_source=ig_web_copy_link

14:46 (IST) 17 Oct 2023
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या वहीदा रेहमान काय म्हणाल्या?

"मी खूप आनंदी आहे. माझा अभिनयसृष्टीतील आतापर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता. इतक्या वर्षांनी मला हा सन्मान मिळतोय, त्यासाठी मी आभारी आहे," असं दादासाहेब फाळके पुरस्काराच्या विजेत्या दिग्गज अभिनेत्री वहीदा रेहमान म्हणाल्या.

https://www.instagram.com/reel/CyfpNM_IYEa/?utm_source=ig_web_copy_link

14:36 (IST) 17 Oct 2023
सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावणारा निखिल महाजन म्हणाला...

"भारत बहुभाषिक देश आहे. कोणतीही एक भाषा नाही, तर सर्व भाषा महत्त्वाच्या आहेत याची जगही दखल घेत आहे. हा चित्रपट गोदावरी नदीवर आधारित आहे आणि गोदावरी काठी राहणाऱ्या कुटुंबावर आधारित आहे. हा चित्रपट दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्यासाठी मी बनवला होता," असं 'गोदावरी' या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाला.

14:16 (IST) 17 Oct 2023
"माझा अभिनयसृष्टीतील प्रवास..." क्रिती सेनॉनचे विधान

"माझा अभिनयसृष्टीतील प्रवास ९ वर्षांचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. इतक्या गंभीर भूमिका लवकर मिळत नाही. पण दिग्दर्शक व निर्मात्यांनी मला ही संधी दिली, त्यासाठी त्यांचे आभार. एका दशकाच्या करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही मोठी गोष्ट आहे," असं क्रिती सेनॉन म्हणाली.

14:13 (IST) 17 Oct 2023
मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही - आलिया भट्ट

"मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. इतक्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारायला मिळाली, याचा खूप आनंद आहे. मी संजय लीला भन्साळींचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली," असं आलिया भट्ट म्हणाली. आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

14:09 (IST) 17 Oct 2023
कमर्शिअल चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप जास्त - अल्लु अर्जुन

"मी खूप खूश आहे की मला हा पुरस्कार मिळतोय. कमर्शिअल चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप जास्त आहे," असं अल्लु अर्जुन म्हणाला. त्याला 'पुष्पा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

14:00 (IST) 17 Oct 2023
करण जोहरने व्यक्त केल्या भावना

"शेरशाह २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट विक्रम बत्रा यांच्या सत्य घटनेवर आधारित होता. त्यांच्या कुटुंबाने चित्रपट बनवण्याची परवानगी दिली त्यासाठी त्यांचे खूप आभार. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीने उत्तम काम केलं आहे," असं करण जोहर म्हणाला.

13:59 (IST) 17 Oct 2023
राजामौली राष्ट्रीय पुरस्काराबद्दल काय म्हणाले?

"मी चित्रपटनिर्माता असून प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो. त्यामुळे कोणताही पुरस्कार माझ्यासाठी बोनस असतो. मला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. आम्हाला सहा पुरस्कार मिळाले आहेत," असं 'आरआरआर' निर्माते राजामौली म्हणाले.

13:54 (IST) 17 Oct 2023
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या रेड कार्पेटवर कलाकारांची मांदियाळी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यातील विजेते रेड कार्पेटवर येत आहेत.

13:02 (IST) 17 Oct 2023
आलिया भट्ट दिल्लीला रवाना

आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठी ती पती रणबीर कपूरबरोबर दिल्ली रवाना झाली.

https://www.instagram.com/reel/Cye7BiavbTD/?utm_source=ig_web_copy_link

12:59 (IST) 17 Oct 2023
केव्हा, कुठे पाहता येणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा?

राष्ट्रीय पुरस्कारांचा हा सोहळा दुपारी दीड वाजता सुरू होईल. डीडी नॅशनल चॅनल आणि त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण आणि प्रसारण होईल. अधिक वाचा

12:57 (IST) 17 Oct 2023
अल्लु अर्जुन पत्नीसह दिल्लीत दाखल

अल्लु अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यासाठी तो पत्नीसह दिल्लीत पोहोचला आहे.

https://www.instagram.com/reel/Cyc_3m8RE92/?utm_source=ig_web_copy_link

69th National Film Awards presentation ceremony by Droupadi Murmu

६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना पुरस्कार प्रदान करतील. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

Story img Loader