Presentation Ceremony of 69th National Film Awards Live Streaming : आज दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या वर्षी २४ ऑगस्ट रोजी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज मंगळवारी (१७ ऑक्टोबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतील. ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत, ते सेलिब्रिटी दिल्लीत दाखल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘या’ चित्रपटांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. राष्ट्रीय पुरस्कारांचा हा सोहळा दुपारी दीड वाजता सुरू होईल. डीडी नॅशनल चॅनल आणि त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण आणि प्रसारण होईल. दूरदर्शन नॅशनलच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या सोहळ्यासाठी आलिया भट्ट, रणबीर कपूर मुंबईतून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. तर, अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरावानी सोमवारी दिल्ली विमानतळावर पोहोचले. ते आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतील.

यंदा बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि क्रिती सेनॉनला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘गोदावरी’साठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. सलील कुलकर्णींनी एकदा काय झालं’साठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला जात असल्याची माहिती पोस्ट करून दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 69th national film awards presentation ceremony by droupadi murmu check where to watch event hrc