आजवर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तर काही चित्रपटातून प्रेमकथा उलगडण्यात आल्या. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. ९० च्या दशकात आलेल्या या चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल मुख्य भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट आजही तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. मात्र सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटात झळकण्यास बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी नकार दिला होता.

१. रविना टंडन – ९० च्या दशकात नावाजलेली अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. रविनाच्या लोकप्रियतेमुळे तिला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र रविनाने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

२. उर्मिला मातोंडकर – उर्मिला मातोंडकरने तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे कुछ कुछ होता है या चित्रपटात ती झळकल्यास याचा फायदा चित्रपटाला झाला असता, याकारणामुळे तिला विचारणा करण्यात आली होती. मात्र उर्मिलानेही हा चित्रपट करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

३. शिल्पा शेट्टी – शिल्पाने १९९३ साली ‘बाजीगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शिल्पाने आतापर्यंत ४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून कुछ कुछ होता है साठी मात्र तिने नकार दिला होता.

४.ऐश्वर्या राय बच्चन – बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रायनेदेखील या चित्रपटासाठी नकार दिला होता. मात्र काही वैयक्तिक कारणासाठी तिने ही ऑफर धुडकावून लावली होती.
५. ट्विंकल खन्ना –
चित्रपटाची स्क्रिप्ट पसंत न पडल्यामुळे ट्विंकलने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर या चित्रपटामध्ये राणी आणि काजोलची निवड करण्यात आली.

६. तब्बू – तब्बूला या चित्रपटात राणी मुखर्जीने वठविलेल्या भूमिकेसाठी तब्बूला विचारणा करण्यात आली होती. मात्र तब्बूने नकार दिला होता. तिच्या नकारानंतर ही भूमिका राणीच्या पदरात पडल्याचं सांगण्यात येतं.

७. करिश्मा कपूर – त्याकाळी करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती. त्यामुळे ती आपल्या चित्रपटात झळकावी अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा होती. याकारणास्तव तिला कुछ कुछ होता है’ ची ऑफर देण्यात आली होती. मात्र अन्य एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता.

 

Story img Loader