70th National Film Awards : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. आज या सर्व पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा सोहळा पार पडला. जाणून घेऊयात विजेत्यांच्या नावांची यादी…

Live Updates
18:01 (IST) 8 Oct 2024
अंबारीवला सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शनाचा पुरस्कार

KGF: Chapter 2 साठी अंबारीवला सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

18:00 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार

महेश भुवनंद यांना अट्टममधील कामासाठी सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला आहे.

18:00 (IST) 8 Oct 2024
रवि वर्मन सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर

रवि वर्मनला दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन: 1 मधील कामासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

17:54 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार गुलमोहर सिनेमाला देण्यात आला.

17:53 (IST) 8 Oct 2024
बेस्ट डॉक्युमेंटरी

बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मुरमूर्स ऑफ द जंगलला देण्यात आला.

17:53 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार द कोकोनट ट्रीला देण्यात आला.

17:51 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट गायक – ब्रह्मास्त्र अरिजितसिंह

सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार ब्रह्मास्त्रसाठी अरिजित सिंहला देण्यात आला.

17:51 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रितमला देण्यात आला.

17:34 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला.

17:33 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पोन्नियिन सेल्वन – भाग १

पोन्नियिन सेल्वन – भाग १ ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

17:33 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट

कार्तिकेय २ ला सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

17:28 (IST) 8 Oct 2024
मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.

17:28 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार उंचाईसाठी सूरज बडजात्या यांना देण्यात आला.

17:26 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखकाचा पुरस्कार

गुलमोहर या हिंदी चित्रपटासाठी अर्पिता मुखर्जीला सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला.

https://x.com/ANI/status/1843620362321572169

17:25 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऋषभ शेट्टीला

कांतारा चित्रपटासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

https://twitter.com/ANI/status/1843624828181397796

17:25 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अट्टमला

अट्टमला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

17:24 (IST) 8 Oct 2024
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

अभिनेत्री मानसी पारेख व नित्या मेनन या दोघींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना मानसीला अश्रू अनावर झाले.

17:24 (IST) 8 Oct 2024
नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

अभिनेत्री नीना गुप्ता यांना उंचाईसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.