मुंबई : ‘राज्यभरात लवकरच दिवसा चित्रपट आणि रात्री नाटक पाहता येईल अशी व्यवस्था असलेली ७५ चित्रनाट्यगृहे बांधण्यात येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे’, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्य सरकारच्या ५८ आणि ५९ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण वरळी येथील डोम एसव्हीपी येथे झालेल्या सोहळ्यात नुकतेच करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना राज्यात चित्रपट उद्याोग बळकट करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

अमेरिकेतील युनिव्हर्सल स्टुडिओच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये ७६ एकरांवर अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याचा तसेच मुंबईच्या ५२१ एकरांवरील चित्रनगरीला अत्याधुनिक रूप देण्याचा आणि नितीन देसाई यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचाही सरकारचा विचार असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राज्यात चित्रपट उद्याोगाच्या विकासासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदी आणि मराठीतील नामांकित चित्रपटकर्मींची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. या पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या काही खास पुरस्कारांचे वितरण सुधीर मुनगंटीवार आणि प्रसिद्ध निर्माते किरण शांताराम यांच्या हस्ते करण्यात आले.

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
batenge toh katenge slogan by bjp in maharashtra assembly election
‘बटेंगे…’चा मुद्दा राज्यातील प्रचारात केंद्रस्थानी कसा आला? भाजप आक्रमक, विरोधक सावध?
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

कंठसंगीतासाठी देण्यात येणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना देण्यात आला. ‘मी खरंतर चित्रकार होणार होतो, पण घरातच गाणे होते. लहानपणीच के. एल. सैगल यांचे गाणे कानावर पडले आणि संगीत क्षेत्राकडे आकर्षित झालो’, अशी भावना भोसले यांनी व्यक्त केली. चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांनी घरचीच शाबासकी मिळाल्यावर होणारा आनंद अनुभवल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

शिवाजी महाराजांची शौर्यगाथा चित्रपटातून उलगडणारे लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना २०२३चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) देऊन गौरवण्यात आले. तर २०२३ साठीचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (१० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) देऊन ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना गौरवण्यात आले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखक- दिग्दर्शक- संकलक एन. चंद्रा यांना यावेळी स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी इतका मोठा पुरस्कार दिल्याबद्दल आशा पारेख यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

२०२४ वर्षासाठीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. ‘ज्या लता दीदी यांना गुरू मानले, त्यांच्या नावाने इतका मोठा सन्मान मिळाला याचे महत्त्व शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे’, असे भावोद्गार अनुराधा पौडवाल यांनी काढले. याशिवाय, २०२१ आणि २०२२ या वर्षासाठी उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन असे विविध पुरस्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टीतील तारेतारकांच्या उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गिरिजा ओक गोडबोले आणि अभिनेता प्रसाद ओक यांनी केले. तर अभिनेता सिद्धार्थ जाधव, वैभव तत्त्ववादी, शुभंकर तावडे, मयूरेश पेम, अभिनेत्री वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, मृण्मयी देशपांडे आदी कलाकारांनी विविध संकल्पनांवर आधारित नृत्य सादरीकरण केले.