कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. सुरेश भट यांनी लिहिलेल्या काही अन्य गझल्स आता पुन्हा एकदा आशा भोसले यांनी गायल्या आहेत. संगीतकार मंदार आगाशे ‘८२-मराठी पॉप आल्बम’ असे या ध्वनिफितीचे नाव आहे. यात सुरेश भट यांनी लिहिलेल्या ओठ आसवांचे, बरसून हा असा चंद्र, तोरण, दिवस हे जाती कसे आदी गझलांचा समावेश आहे. या सर्व गझल्स आगाशे यांनी पॉप, रेगे, ब्लुज, रॉक, बॅलाड, सोलच्या साजात संगीतबद्ध केल्या आहेत. ८२ वर्षीय आशा भोसले यांनी ही सर्व गाणी गायली आहेत. या निमित्ताने एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या विषयीची माहिती http://www.82pop.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2016 रोजी प्रकाशित
८२ व्या वर्षीय आशा भोसले यांचा ‘तरुण’ आवाज
सुरेश भट यांनी लिहिलेल्या काही अन्य गझल्स आता पुन्हा एकदा आशा भोसले यांनी गायल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 12-04-2016 at 02:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 82 marathi pop album by asha bhosle