घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या अभिनेत्रीने त्या पीडित मुलीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे. जर घरातले काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर ती अभिनेत्री संतापून मारहाण करत असल्याचाही आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही २५ वर्षीय अभिनेत्री सध्या सिनेसृष्टीत स्ट्रगल करत आहे. या अभिनेत्रीने त्या पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच त्या अभिनेत्रीने जबरदस्ती तिचे कपडे काढून व्हिडीओ आणि फोटो काढल्याचा दावाही त्या पीडित मुलीने केला आहे. तर दुसरीकडे ही मुलगी काम नीट करत नाही, असे त्या अभिनेत्रीचे म्हणणं आहे. या मुलीने यापूर्वी कधीही अशाप्रकारची तक्रार दाखल केलेली नसल्याचे समोर आले आहे.

accused molested four year old girl sentenced to twenty years of hard labor and fine
चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वीस वर्षाची सक्तमजुरी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…
47 year old man who sexully abused girl with knife arrested by Wadala tt police
चाकूचा धाक दाखवून मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या अभिनेत्री त्या पीडित मुलीला सँडलने मारहाण केली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या मुलीच्या बहिणीने तिच्या डोक्यावर जखम झाल्याचे पाहिले. त्यानंतर तिने तिची विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. यानंतर तिने तात्काळ वर्सोवा पोलीस स्टेशन गाठत त्या अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा : प्रीति झिंटाने मुलांसोबत बघितला ‘बॉब बिस्वास’, अभिषेक बच्चनच्या भूमिकेबद्दल म्हणाली…

दरम्यान त्या अभिनेत्रीवर भारतीय संहितेच्या कलम ३२६, ३५४ (बी), ५०४ आणि POCSO अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या अभिनेत्रीला ती मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. मात्र तरीही तिने तिला कामावर ठेवले. सध्या त्या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे.

Story img Loader