प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahbadia) हा त्याच्या पॉडकास्टमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. तो लोकप्रिय यूट्यूबर्सपैकी एक असून, त्याच्या पॉडकास्टमध्ये अनेकविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळते. त्यामध्ये बॉलीवूड कलाकारांचादेखील समावेश आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. आता मात्र तो त्याच्या पॉडकास्टमुळे नाही, तर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्यामध्ये तो व त्याची गर्लफ्रेंड पाण्यात बुडता बुडता वाचले, असे त्याने म्हटले आहे.

काय म्हणाला रणवीर अलाहाबादिया?

रणवीर अलाहाबादियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुम्हा सर्वांना गोव्यातून ख्रिसमसच्या शुभेच्छा! माझ्या आयुष्यात हा ख्रिसमस अनेक घडामोडींनी भरलेला ख्रिसमस ठरला. मला व माझ्या गर्लफ्रेंडला खुल्या समुद्रात पोहायला खूप आवडते. मी लहान असल्यापासून समुद्रात पोहतो. आम्ही दोघे चांगले जलतरणपटू आहोत; पण निसर्ग कधीतरी तुमच्या क्षमतांची परीक्षा घ्यायचे ठरवतो. काल समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आम्ही बुडत होतो. माझ्याबरोबर हे आधीही झाले आहे. मात्र, त्यावेळी माझ्याबरोबर कोणीही नव्हते. एकटे पोहत बाहेर येणे सोपे आहे. पण, तुमच्याबरोबर कोणी असेल, तर त्यांना तुमच्याबरोबर बाहेर आणणे कठीण असते. ५-१० मिनिटे आम्ही प्रयत्न केल्यानंतर मदतीसाठी हाक मारली. जवळच पोहत असलेल्या एका कुटुंबाने आम्हाला मदत केली. लाटांमध्ये पोहायला मजा येते; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आम्ही अडचणीत सापडलो. आम्ही पाण्यात बुडण्यापासून वाचण्यासाठी धडपडत होतो. जेव्हा खूप पाणी पोटात गेले आणि मी थोडा पाण्याच्या आत जाऊ लागलो, त्याच वेळी मदत मागण्याचे ठरवले.”

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान

“आम्हा दोघांना वाचवणाऱ्या आयपीएस पती व आयआरएस पत्नी असलेल्या कुटुंबाचा मी ऋणी आहे. या अनुभवामुळे आम्ही नि:शब्द झालो आहोत; पण त्याबरोबरच आम्ही कृतज्ञदेखील आहोत. असे वाटले की, या संपूर्ण घटनेत देवानेच आमचे रक्षण केले. आम्ही जिवंत आहोत यामुळे आम्हाला कृतज्ञता वाटत आहे. या अनुभवामुळे माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.”, असे लिहीत रणवीरने त्याच्या पोस्टमध्ये तो व त्याची गर्लफेंड पूर्णत: बरे असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली! समुद्रकिनारी केलं प्री-वेडिंग शूट; होणारी पत्नी आहे सेलिब्रिटी छाया चित्रकार, पाहा फोटो

ही पोस्ट शेअर करताना रणवीर अलाहाबादियाने त्याचे व त्याच्या गर्लफ्रेंडचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबरच समुद्रात पोहतानाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. रणवीर अलाहाबादिया अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो शेअर करतो; मात्र तिचा चेहरा दाखवत नाही. त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, याबद्दल त्याने खुलासा केलेला नाही. त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

Story img Loader